युगांत

युगांत
या भावनाशून्य जगात
भावनांना ग्राहक नाही
वाहकच अत्याचार करतात
बालात्काराना अंत नाही

वत्स्रहरणाचे प्रयोग
हल्ली तर रोज होतात
एकावर एक फुकट दिले
तरच कपड्याचे बस्ते उठतात

कृष्ण कलियुगात थकला आहे
मदतीला कोण धावणार
भीष्म न्याय करणार नाहीत
धृतराष्ट्रांची संख्या वाढणार

अर्जुन ‘पण’ जिंकणार नाही
द्रोपाडीची हत्या होणार
झोपड्यांच्या खांडववनाला
आग लावण्याची वाट पाहणार

हे वर्णन सत्य आहे
पण हिमनगाचे टोक आहे
त्सुनामीची वाट पहा
‘कृपा’च जगाला गिळत आहे

प्रिन.राम म्हात्रे

http://orkut.google.com/c826350-t4186f0b4a642fb6f.html

सगळ्या घोरणाऱ्या बंधू-भगिनींसाठी हे विडंबन-काव्य-

सगळ्या घोरणाऱ्या बंधू-भगिनींसाठी हे विडंबन-काव्य-
सगळ्या घोरणाऱ्या बंधू-भगिनींसाठी हे विडंबन-काव्य——!!

मूळ कविता ———लाजून हसणे अन———-(कवी मंगेश पाडगावकर)

दणकून घोरणे अन इतरांस त्रास देणे
सखये/सखया तुला मिळाले हे जन्मजात लेणे !!धृ!!

झोपेत घोरता तू, दचकून जाग यावी
निद्रिस्त त्या जनांची,मग झोपमोड व्हावी
मारून चापटी ती , माझे तुला उठवणे ———!!१!!

लावून एक सूर , तालात घोरताना
घन-गर्जना करून,ती शांती भंगताना
स्वर्गस्थ देवतांना कर जोडूनी आळवणे ———!!२!!

डरकाळी वाघ फोडी त्याची स्मृतीच होते
पण तू न मानसी हे तव घोरणेंच होते
निर्वेध घोरताना ऐसे तुला पहाणे ————–!!३!!

साधना————-

http://orkut.google.com/c826350-tb8bbd71fbcb16cf2.html

रामभरोसे!

रामभरोसे!

रामभरोसे!

रस्त्याने चालण्या अघोषित बंदी,

फेरीवाल्यांना फुटपाथवर संधीच संधी,

दररोजच्या प्रवासाने रिकामे खिसे,

पुण्याची वहातुक रामभरोसे!

बसवाल्यांची येथे चाले मनमानी,

रिक्षावाला इथला भलताच मानी,

हळू चालवणारांचे हमखास हसे,

पुण्याची वहातुक रामभरोसे!

फुटपाथ दिला विक्रेत्याना आंद्ण,

पार्किंग जागेसाठी घडोघडी भांडण,

प्रत्येकाला घाई,ट्राफिक मधे फसे,

पुण्याची वहातुक रामभरोसे!

बसवाले थांबतात,रस्त्याच्या मधे,

चालणा-यांचे कान,मोबाईलच्या मधे,

बाईकवाल्यांच्या अंगी सैतान घुसे,

पुण्याची वहातुक रामभरोसे!

वाहतुक शाखा झाली वसुली शाखा,

जमलच तर कधीतरी नियंत्रण होते,
सावज पकड्ण्याचे लागलय पिसे,

पुण्याची वहातुक रामभरोसे!

अतिक्रमणांना तर धरबंध नाही,

पालिकेला काही पत्ताच नाही,

रस्त्यांमधे अर्ध्या विक्रेता बसे,

पुण्याची वहातुक रामभरोसे!

कारभारी इथे मेट्रोचं बोलतात,

स्वार्थासाठी एकमेकाशी भांडतात,

जनांची काळजी कुणाला नसे,

पुण्याची वहातुक रामभरोसे!

प्रत्येकाला इथे भलतीच घाई,

जीवाची स्वत:च्या पर्वाच नाही,

हरेक वाहन पुढे पुढे घुसे,

पुण्याची वहातुक रामभरोसे!

…….प्रल्हाद दुधाळ.

http://orkut.google.com/c826350-t969ba097a0586220.html

आयुष्य.

आयुष्य.

आयुष्य.

आयुष्य माणसाच,

खरं तर ’पाणी’संथ वाहणारं!

उथळ असेल मार्ग,

खळखळ आवाजात वाजणारं!

असेल जर नागमोडी वाट,

दुडूदुडू करत धावणारं!

तुटला अचानक प्रवाह,

धबधबा होऊन कोसळणारं!

आलाच कुठे अडसर,

शक्यतो मार्ग वेगळा शोधणारं!

मिसळेल ज्यामधे त्याचा,

रंग तसा धारण करणारं!

अडवल तर अडणारं.

संधी मिळाली तर भिडणारं!

आयुष्य माणसाच,

खरं तर ’पाणी’ संथ वाहणारं!

प्रल्हाद दुधाळ.

http://orkut.google.com/c826350-t52bb8c1ff5992aa.html

गोष्ट माझ्या आईची

गोष्ट माझ्या आईची
(पितृ प्रेम मिळेल असे सगळे नशिबवान नसतात )

गोष्ट माझ्या आईची

शंभर रुपये कमवायला ती
आठ आठ km पाई पाई जायची
आज सांगतो गोष्ट
मी माझ्या हिम्मतवान आईची

माझ्या admission साठी तू
convent मध्ये गेली होती
donation ला पैसे नाही
म्हणून अपमानित झाली होती

“माझा मुलगा हुशार आहे
कोणी तरी या सिस्टर ला सांगा”
पाहिल्या आहेत वाहताना रात्र भर
तुझ्या डोळ्यातून जमुना ,गंगा

दिवाळीत नवीन नसले तरी
स्वच्छ कपडे घालायचे,असे तू सांगितले
स्वाभिमानाने कसे जगायचे
हे आम्हाला शिकवले

चकली चिवडा आवडत नाही
अस मी शेजारी सांगायचो
घरी आल्यावर आपण दोघही
किती ग रडायचो

कौलारू आपल्या घरात पाउस
पूर्ण साम्राज्य निर्माण करायचा
table वर बसून खिन्न डोळे,हसरा चेहरा
कसा मी विसरायचा?

राब राब राबून तू आम्हाला
खूप मोठे केले
सांग आता तुझे
कुठले स्वप्न राहिले

तुझे कुठले हि स्वप्न,इच्छा,आकांक्षा
आता मी पूर्ण करील
नाही जर केले तर
माझ्या आयुष्याला काय अर्थ राहील?

राजेश जोशी

http://orkut.google.com/c826350-t2b9b99c1d1252145.html

देतोय का नाही ते तरी बघायच

देतोय का नाही ते तरी बघायच…………………
आपलं प्रेम तसं long distance love च
भेट तशी online च असायची
तुला कधी भेटवस वाटलंकी
“पाहू कधी तरी” म्हणून मोकळी वाहयचीस
तेव्हा माझ्या जीवाची तडफड
तुला कधी नाही दिसायची

फोन वर बोलता बोलता
कधी फोन waiting आल्यावर
थांब म्हणून सांगायचीस
माझं कधी waiting असल्यावर
असं कधी नाही करायचीस
तेव्हा माझ्या जीवाची उलघाल
तुला कधी नाही समजायची

आपण कधी भेटल्यावर
तुला माझ्या पेक्षा तुझ्या
मित्रांची काळजी जरा जास्त असायची
अर्धी भेट सोडून जाताना
तेव्हा माझ्या जीवाची तळमळ
तुला कधी नाही कळायची

तू पाहिलेल्या स्वप्नात नेहमी
मला घेऊन जायचीस
तुझ्या सारखं मी पाहिलेल्या स्वप्नात
पण तू कधी नाही रमाय्चीस
तेव्हा माझ्या जीवाची तगमग
तुला कधी नाही उमजायची

नेहमी माझ्या प्रेमाची परीक्षा घ्याचीस
हे असं झालं तर, ते तसं झालं तर
“तूझं खरं प्रेम असेल” म्हणून
नेहमी मला हिंवाय्चीस
तेव्हा सारखं वाटायचं
एकदा काळीज माघून तरी बघ
देतोय का नाही ते तरी बघायच
ते तरी बघायच …………

http://orkut.google.com/c826350-tdfb492816a5908b3.html

आत्मघाताच्या प्रथा

आत्मघाताच्या प्रथा

.

नका करू साजरी होळी

… मूर्ख उगाच लाकडे जाळी

असा कसा धर्म तुमचा

जो शिकवतो जाळपोळी

होळीच्या नावाखाली वृक्ष तोडून

पर्यावरणाची वाट लावा

असा तुमचा धर्म सांगतो तर

मला एक गोष्ट समजवा

गेल्या वर्षी होळी केली

किती वाईट गोष्टी जाळल्या

सर्वात वाईट बाब ही की

तुम्ही चुकीच्या प्रथा पाळल्या

आता मात्र एक करा

भक्त प्रल्हादाचा मार्ग धरा

नारायण -नारायण करीत होळीत बसा

बघा तुमचा देव येतोय का उद्धारा

कुणीतरी काहीही सांगायचे

उगाच धर्माचा मुलामा देवून

पण तुम्ही का जाता त्यांच्या मागे

आपली उपजत बुद्धी गहाण ठेवून

जे जे आस्तिक असतील आणि

ज्यांना धर्माचा आहे फालतू अभिमान

त्यांनी प्रल्हाद बनून दाखवावे

हेच माझे तुम्हा आव्हान

अरे मुर्खांनो अग्नीचा धर्म

जे जे जळण्यायोग्य ते ते जाळणे

ही अक्कल तुम्हास नाही

म्हणून तुमचे हे प्रथा पाळणे

होलिका-बिलिका ,प्रल्हाद-बिल्हाद

ह्या साऱ्या काल्पनिक कथा

दैववादाच्या आहारी गेलात

म्हणून तुमच्या वाढल्यात व्यथा

स्क्रू तुमचा ढीला झालाय

म्हणून दरवर्षी नाहक लाकडं जाळताय

खरा मित्र निसर्ग हे विसरून

आत्मघाताच्या प्रथा पाळताय

————-लोककवी प्रशांत गंगावणे

http://orkut.google.com/c826350-tcfdbfd6f664b1d20.html

गोंधळात गोंधळ

गोंधळात गोंधळ
शांत झोपलेल्या तुझ्या ओठावर
हलकेच मी ओठ टेकले
पण डोळे न उघडता तू हसलीस
आणि माझे जीवनच ढवळून गेले

तुझ्या स्वप्नात कोण असेल
लक्ष्यात काही येईना
नुसता गोंधळ उडून गेला
विचार काही जाईना

तुझ्या मित्रांची नावे आठवता
यादी काही संपेना
माझे काय मी नक्की कुठे
काही काही कळेना

“स्पर्श ओळखते राजा मी
बावळटपणा सोड ना ”
डोळे उघडून हसत बोललीस
लोच्या माझा झाला ना

आणखी कुणाचा स्पर्श तुला
झालां असेल कळेल का
बावळटपणा वाढत जातोय
गोधळ कधी संपेल का

प्रिन.राम म्हात्रे

http://orkut.google.com/c826350-t3145021e3fa2dde1.html

बाबा आमटे….

बाबा आमटे…. & family
.
तुझ्या सारखं एकदा, थोडं तरी जमायला हवं
तुझ्या इतकं एकदा, धुंदीत जगायला हवं

नुसताच नको कळवळा, नुसतीच नको शब्द कळा
तुझ्या सारखं एकदा, जंगलात जायला हवं
तुझ्या सारखं एकदा……

“त्यांना” पहाताच आम्ही, दूर-दूर पळतो
तुझ्या सारखं एकदा, आपलं म्हणायला हवं
तुझ्या सारखं एकदा….

मुलं असतात आपली, हिरव्या कार्डात मश्गूल
तुझ्या सारखं एकदा, त्यांनी मागे रहावं
तुझ्या सारखं एकदा…..

http://orkut.google.com/c826350-t6bfb832e22ab7108.html

तुझ्यासारखं जमायला हवं..

तुझ्यासारखं जमायला हवं..
तुझ्यासारखं जमायला हवं..,
कोणत्याही गोष्टीला लाईटली घेणं..
हसण्यावारी नेणं..
सराईतपणे नेहमीचा रस्ता टाळून
आडवाटेनं जाणं..

तुझ्यासारखं जमायला हवं…,
सरळमार्गी वागणं.
साधेपणाने जगणं
दुस-यासाठी जगता जगता
आपला हक्क मागणं

तुझ्या सारखं वसवता यायला हवं
मलाही आभाळ
तुझ्यासारखं गवसायला हवं
मलाही क्षितिज नवं

पण….
त्यासाठी तुझ्यासारखं
मला एकदातरी जमायला हवं..

– राज

http://orkut.google.com/c826350-t6bfb832e22ab7108.html